IT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या
आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारले की, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नोटीशीतील नियमांचे पालन अद्याप का केले नाही.
नवी दिल्ली : आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारले की, त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या नोटीशीतील नियमांचे पालन अद्याप का केले नाही. मंत्रालयाने विचारले की, अद्यापही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती का नाही केली. जर नियुक्ती केल्या असतील त्याचे विवरण आज सायंकाळपर्यंत मंत्रालयाला पाठवावे.
मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे की, तुम्ही स्वतःला सोशल मीडिया मानत नसाल तर, त्याचे कारण सांगा. मंत्रालय कोणतीही अतिरिक्त माहिती मागवण्यासाठी तसेच कारवाई करण्यास स्वतंत्र आहे. मंत्रालयने नवीन सोशल मीडिया नियमांच्या अंतर्गत कंपन्यांद्वारे नियुक्त मुख्य अनुपालन अधिकाऱ्याबाबत माहिती मागवली आहे. आयटी मंत्रालय सोशल मीडियाच्या चौकशीसह इतर नियमांबाबत बुधवारपासून अॅक्शन मोडवर आहे.
सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना लवकरात लवकर नव्या आयटी नियमांच्या अंतर्गत कंपाइल्ड डिटेंल्स मागवल्या आहेत. 50 लाखापेक्षा जास्त युजर्स भारतात नोंदणी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानला जाणार आहे.