मला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी
पती जेलमध्ये कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.
Gwalior News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका आरोपीच्या पत्नीने जेल अधिकाऱ्यांकडे अजब मागणी केली आहे. पतीला जामीन मिळावा किंवा तो पॅरोलवर बाहेर यावा यासाठी या महिलेने विचित्र कारण दिले आहे. या महिलेने थेट जेल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. या महिलेचा अर्ज वाचून जेल अधिकाऱ्यांनी डोक्याला कारण लावला. कारण या महिलेने अत्यंत खाजगी कारण देत पतीला जेलबाहेर सोडण्याची विनंती केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अर्जदार महिला सासू सासऱ्यांसह गावात राहते. तर, तिचा पती मागील दोन वर्षांपासून तुरुंगात आहे. लग्न झाल्यानंतर काही वर्षातच या महिलेच्या पतीला एका खूप प्रकरणात अटक करण्यात आली. लग्नानंतर पतीसोबत जास्त वेळ घालवता आला नाही. यानंतर पती थेट तुरुंगात गेला. यामुळे मातृत्व सुखाचा अनुभव घेता आलेला नाही असे या महिलेने आपल्या अर्जात म्हंटले आहे.
मला आई व्हायचे आहे.
मला आई व्हायचे आहे. आमचा वंश वाढवायचा आहे. माझ्या सासू सासऱ्यांच्या देखील त्यांच्या मुलाकडून अपेक्षा आहेत. यामुळे मला मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी माझ्या पतीला जामीन मंजूर करावा अशी मागणी अर्जाद्वारे या महिलेने केली आहे. माझे पती दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांचे तुरुंगातील वर्तन देखील अत्यंत चांगले आहे, यामुळे आमचे माता पित्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना पॅरोल मंजूर करावा.
जेल अधिकाऱ्यांनी भूमिका
आरोपीच्या पत्नीचा अर्ज पाहून जेल अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला. हत्या आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्हांमध्ये आरोपींना पॅरोल देण्याचा नियम नाही, मात्र जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधीक्षकांनी मान्यता दिल्यास या कैद्याला जामिनावर सोडता येईल असे ग्वाल्हेर सेंट्रल जेलचे अधीक्षक विदित सुरवैया यांनी सांगितले. या प्रकरणाची फाईल कारागृह प्रशासनाच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिस अधिक्षकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही फाइल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांनी याला मंजुरी दिल्यास पीडित महिलेच्या मागणीनुसार कैद्याला विहित कालावधीसाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.
कुंटुंबियांचे गंभीर आरोप
आरोपी दारा सिंह जाटव याचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही वर्षात गावात एक खून झाला. याच खून प्रकरणात दारा सिंह याला अटक झाली. मात्र, ही अटक बेकायदेशीर असून माझ्या मुलाला मुद्दाम या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप आरोपीचे वडिल करीम जाटव यांनी केला आहे.