तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे ग्लोबल कंपन्या अलर्ट! आता या कंपनीने वाढवली वर्क फ्रॉम होमची मर्यादा

ग्लोबल कंपन्यांनी कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटला गांभिर्याने घेतले आहे. जेणेकरून कोणत्याही चुकीचा फटका कर्मचाऱ्यांना बसायला न
मुंबई : ग्लोबल कंपन्यांनी कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटला गांभिर्याने घेतले आहे. जेणेकरून कोणत्याही चुकीचा फटका कर्मचाऱ्यांना बसायला नको. गुगलनंतर Uber Technologies Inc ने सुद्धा कर्मचाऱ्यांच्या वर्क फ्रॉम होमची सीमा ऑक्टोबरपर्यंत पुढे वाढवली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेक मोठ्या कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने कंपन्या सजग असल्याचे दिसून येत आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक ग्लोबल कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सीमा सध्या पुढे ढकलली आहे. ऑक्टोबरच्या शेवटापर्यत वर्क फ्रॉम होम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये आता Uber सुद्धा सामिल झाले आहे.
13 सप्टेंबर पासून सुरू होणार होते ऑफिस
Uber Technologies Inc ने आपल्या कर्मचाऱ्यांना म्हटले की, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा वाढवली आहे. याआधी कंपनीने एप्रिल महिन्यात घोषणा केली होती की, 13 सप्टेंबर पासून ऑफिसेस सुरू करण्यात येतील. परंतु डेल्टा वेरिएंटची संसर्ग शक्ती पाहता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मर्यादा ऑक्टोबरच्या शेवटापर्यंत वाढवण्यात आली आहे.