नवी दिल्ली : भारतात गुंतवणूक आणि विकासाच्या पार्श्वभूमीवर  ग्लोबल फायनान्शिअल सर्विस प्रोवाइडर Fidelity Information Services (FIS)ने पुढील वर्षी भारतात 10 हजार जणांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 हजार लोकांना मिळणार नोकरी 
कंपनीने म्हटले आहे की, पूर्ण भारतात येत्या वर्षात FIS च्या योजनांच्या सर्व स्तरांवर 10 हजाराहून अधिक  लोकांना आपल्या सोबत जोडणार आहे. कंपनीने या भरतीत टिअर 2 आणि टिअर 3 शहरांतील पदवीधरांची भरती करण्याचे नियोजन केले आहे.


या शहरात मिळणार नोकरी
एफआयएस इंडियामध्ये गुरूग्राम, जयपूर, मॅंगलोर, कानपूर, कोयंबतूर, तिरूवनंतपूरम, जालंधर, सोलापूर  आणि गुवाहाटीसह देशातील वेगवेगळ्या भागातील शिक्षण संस्थांमधून भरती करण्यात येईल.


या नोकऱ्यांसाठी निवड झालेले उमेदवार मुंबई, बंगलोर, चैन्नई, पुणे, इंदोर, मोहाली, गुरूग्राममध्ये एफआयएसचे कार्यालय येथे काम करतील.