Go Fashion च्या शेअरची बाजारात दमदार एन्ट्री; लिस्टिंगवर मिळाला तब्बल 91 % परतावा
गो फॅशन लिमिटेडच्या शेअरने शेअर बाजारात दमदार एन्ट्री केली आहे. कंपनीचा स्टॉक बीएसईवर 91 टक्के प्रीमियमसह 1316 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला. इश्यूची किंमत 690 रुपये होती.
मुंबई : गो फॅशन इंडिया लिमिटेडच्या शेअरने शेअर बाजारात बंपर एन्ट्री केली आहे. कंपनीचा स्टॉक बीएसईवर 91 टक्के प्रीमियमसह 1316 रुपयांच्या किंमतीला बाजारात लिस्ट झाला झाला. गो फॅशनने IPO साठी 690 रुपये शेअरची किंमत निश्चित केली होती.
गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर प्रति शेअर 626 रुपये नफा झाला आहे. शेअर्समध्ये चांगल्या नफ्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक करावा का? की, जास्त कालावधीसाठी स्टॉक ठेवावा. झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी यांनीही या संदर्भात आपले मत मांडले आहे.
गुंतवणूकदारांनी आता काय करावे?
अनिल सिंघवी म्हणतात की गो फॅशनचा स्टॉक दीर्घ अवधीसाठी चांगला परतावा देऊ शकतो. स्टॉक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. तर शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी रु. 1000 चा स्टॉप लॉस ठेवावा. जसजसा स्टॉक वाढत जाईल तसतसे स्टॉपलॉस वाढवून नफा बुक करावा.
गो फॅशन ही कर्जमुक्त आणि रोखीने समृद्ध कंपनी आहे. प्रवर्तकांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. काही नकारात्मक मुद्दे देखील आहेत. कारण व्यवसायात स्पर्धा जास्त असून कंपनीचा आकार लहान आहे. तर कंपनीची ऑनलाइन विक्रीही कमी आहे.
गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली
गो फॅशनच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हा इश्शू 135.46 पट सबस्क्राइब झाला. IPO चा 75 टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव होता.
तर 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के राखीव होते
निधी कुठे वापरला जाईल
IPO द्वारे उभारलेला निधी 120 नवीन एक्सक्लूसिव ब्रँड आउटलेट उघडण्यासाठी वापरला जाईल.
गो फॅशनच्या IPO साठी किंमत 655-690 रुपये निश्चित करण्यात आली होती. ज्यामध्ये IPO मध्ये 21 शेअर्सचे लॉट आकार होते. ताज्या इक्विटी शेअर्सच्या इश्यू व्यतिरिक्त, OFS देखील होते.
---
ही बातमी वाचली का?
Star Health | राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक असलेली कंपनीचा IPO खुला होणार; काय असावी स्ट्रॅटेजी? वाचा
ओमायक्रॉनबाबत अमेरिकी अध्यक्षांच्या एका वक्तव्याने जगभरातील शेअर बाजार पुन्हा तेजीत