Airline extends flight cancellations : देशातील आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. वाडिया ग्रुपच्या एअरलाइन्स GoFirst ने 3 आणि 4 तारखेला दैनंदिन उड्डाणे रद्द केली असून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) कडे स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी ही माहिती दिली आहे. विमान कंपन्यांनी केंद्र सरकारलाही याबाबत कळवले असून लवकरच DGCSmore (DGCA) सविस्तर अहवाल सादर करणार आहे. याचदरम्यान  आर्थिक संकटामुळे गो फर्स्ट एअरलाइन्सने 28 मे 2023 पर्यंत उड्डाणे रद्द केली आहेत. यापूर्वी, ऑपरेशनल कारणांचा हवाला देऊन, 26 मे तारखेपर्यंत उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

GoFirst ने सांगितले की, इंजिन पुरवठ्यावर वारंवार होणाऱ्या खर्चामुळे त्यांची निम्मी विमाने उड्डाण करू शकली नाहीत, त्यामुळे कंपनी आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करू शकली नाही. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, दिवाळखोरीचे निराकरण करण्यासाठी एनसीएलटीकडे जाण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. यासाठी कंपनीने इंजिन सप्लायर कंपनी Pratt & Whitneyver (P&W) कडून इंजिन न मिळण्याचे सर्वात मोठे कारण दिले आहे. त्याने प्रॅट अँड व्हिटनीव्हरवर विमानाच्या इंजिनांचे खराब झालेले भाग दुरुस्त करण्याच आणि पुरवण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही केला आहे. 


वाचा: 'पाटील' आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर


याबाबत GoFirst India Limited ने सांगितले की, आमची जवळपास 50 टक्के विमाने इंजिनातील समस्यांमुळे तशीच पडून आहेत. याशिवाय ऑपरेशन कॉस्ट दुप्पट झाल्यामुळे GoFirst च्या महसुलात 10,800 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एअरलाइनने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कंपनी आपली आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याच्या स्थितीत नाही, म्हणून ती एनसीएलटीकडे अर्ज दाखल करण्यासाठी आली आहे.


यावर GoFirst ने सांगितले की, प्रवर्तकांनी आतापर्यंत 6,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापैकी 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक गेल्या 24 महिन्यांत झाली आहे. एप्रिल 2023 पर्यंत प्रवर्तक समूहाने एअरलाइनमध्ये 290 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, GoFirst ने 3 आणि 4 मे रोजी होणाऱ्या उड्डाणे रद्द केल्या आहेत. तेल कंपन्यांची थकबाकी भरू न शकल्याने विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता गो फर्स्टचे एअपलाइन्स 28 मे 2023 पर्यंत उड्डाणे रद्द केली आहेत. या विमानाचे लवकरच बुकींग पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी शक्यता एअरलाइन्सकडून वर्तवण्यात आली आहे. 


दरम्यान, गो फर्स्ट एअरलाइन्स ही वाडिया ग्रुपची बजेट एअरलाइन्स आहे. GoFirst Airlines ने नोव्हेंबर 2005 मध्ये मुंबई ते अहमदाबाद हे पहिले उड्डाण सुरू केले. GoFirst च्या ताफ्यात 59 विमाने आहेत. कंपनी 27 देशांतर्गत आणि 8 आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर आपली उड्डाणे  करत आहेत.