पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शनिवारी रात्री गोव्यातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना उच्च गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी साठी गोव्यात मेडिकल कॉलेज नेल जात असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील एका निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या तब्बेतीत आता पहिल्यापेक्षा सुधार आहे. 



पर्रिकरांना साधारण 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान जीएमसीएचच्या बाहेर मोठ्या संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याआधी गोवा सरकारच्या ज्येष्ठ मंत्री विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याचे वृत्त सरदेसाई यांनी फेटाळले. पर्रिकर मागच्या वर्षभरापासून आजारी आहेत. त्यांना पॅंक्रियाज संबधी समस्या आहे. अमेरिकेत त्यांच्यावर उपचार झाले आहेत. ते काही दिवस दिल्लीच्या एम्स मध्ये देखील भरती होते.