पणजी : काँग्रेसमध्ये नेतृत्व करण्यासाठी तरूणांनी पुढे यावे तसेच, ज्येष्ठांनीही त्यांना संधी द्यावी, असे अवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांदी यांनी काँग्रेसच्या दिल्ली येथील अधिवेशनात केले होते. या भाषणातून प्रेरणा घेत आणि अवाहनाला प्रतिसाद देत गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युवा नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


राहुल गांधींच्या अवाहनाला दिला प्रतिसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांताराम नाईक असे या प्रदेशाध्यक्षांचे नाव आहे.  शांताराम नाईक हे येत्या १२ मार्चला वयाची ७२ वर्षे पूर्ण करत आहेत. नाईक यांनी म्हटले आहे की, राज्यातील युवा पिढीला आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. पुढे त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर आपण तत्काळ राजीनामा देणार होतो. पण, आपण स्वत:ला सावरले. महत्त्वाचे असे की, नाईक हे पहिले असे नेते आहेत ज्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर प्रेरित होऊन पदाचा नराजीनामा दिला आहे.


गुजरात कांग्रेस प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोळंकीही राजीनामा देणार?


दरम्यान, शक्यता वर्तवली जात आहे की, गुजरातमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरत सिंह सोळंकी हेसुद्धा राजीनामा देऊ शकतात. गेल्याच वर्षी गोव्यातील ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शांताकुमार नाईक यांना गोवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते.