मुंबई : गोवा विधानसभेच्या ४० पैकी २० जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या विजयानंतर भाजप गोवा कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू केला आहे. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, मी कमी फरकाने जिंकलो असलो तरी राज्यात आम्ही बहुमताने जिंकलो आहोत. आमच्या 20 जागा निश्चित झाल्या आहेत. तर, 3 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोव्यात भाजप सरकारच येईल. 

 

सांतआंद्रे मतदारसंघातील रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे विजयी उमेदवार विरेश बोरकर यांनी आपला विजय हा "पैसे आणि पॉवरशिवाय झालेला विजय" असल्याचे म्हटलंय. तर, काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी, पक्ष जनतेचा जनादेश मान्य करत आहे. विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे आम्ही काम करू. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला कठोर परिश्रम घ्यावे लागतील, असे सांगितले. 

 

गोवा विधानसभेत कुणाला किती जागा...?

 

भाजप - 20, काँग्रेस - 11, आप - 2, मगो - 2, आरजीपी - 1, अपक्ष - 3, गोवा फॉरवर्ड पार्टी - 1, तृणमूल काँग्रेस - 0, राष्ट्रवादी 0

 

गोव्यात AAP ने 2 जागा जिंकून आणि TMC उमेदवार आलेमाव यांचा पराभव केला आहे. 'एकीकडे "आप" पक्ष पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तर, दुसरीकडे 'आप'ने दक्षिण गोव्यात दोन जागा जिंकत गोवा विधानसभेत प्रवेश केलाय.

 

2017 च्या विधानसभा निवडणुकीत 'आप"ला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ने वेळी आणि बाणावली मरदारसंघात विजय मिळवला आहे.

 

हे आहेत विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार

 

1) हळदोणे -  ग्लेन टिकलो (भाजप), कार्लोस फरेरा (काँग्रेस)

2) बाणावली - व्हेन्झी व्हिएगस (आप), टोनी डायस (काँग्रेस)

3) डिचोली - चंद्रकांत सावळ (अपक्ष), नरेश सावळ (मगो)

4) कळंगुट - मायकल लोबो (काँग्रेस), जोसेफ सिक्वेरा (भाजप)

5) काणकोण - रमेश तवडकर (भाजप), जनार्दन भंडारी (काँग्रेस)

6) कुठ्ठाळी - गिरीश पिल्लई (अपक्ष), आंतोनियो वाझ (अपक्ष)

7) कुंभारजुवे - राजेश फळदेसाई (काँग्रेस), रोहन हरमलकर (अपक्ष)

8) कुंकळ्ळी - युरी आलेमाव (काँग्रेस), क्लाफास डायस (भाजप)

9) कुडचडे - नीलेश काब्राल (भाजप), अमित पाटकर (काँग्रेस)

10) कुडतरी - आलेक्स रेजिनाल्डा लॉरेन्स (अपक्ष), रुबर्ट परेरा (रिव्होल्युशनरी गोवन्स)

11) दाबोळी - माविन गुदिन्हो (भाजप), कॅप्टन व्हिरियातो फर्नांडिस (काँग्रेस)

12) फातोर्डा - विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड), दामू नाईक (भाजप)

13) मये -  प्रेमेंद्र शेट (भाजप), संतोष सावंत (गोवा फॉरवर्ड)

14) मांद्रे - जीत आरोलकर (मगो), दयानंद सोपटे (भाजप)

15) म्हापसा - जोशुआ डिसोझा (भाजप), सुधीर कांदोळकर (काँग्रेस)

16) मडकई - रामकृष्ण (सुदिन) ढवळीकर (मगो), प्रेमानंद गावडे (रिव्होल्युशनरी गोवन्स)

17) मडगाव - दिगंबर कामत (काँग्रेस), मनोहर (बाबू) आजगावकर (भाजप)

18) मुरगाव - संकल्प आमोणकर (काँग्रेस), मिलिंद नाईक (भाजप)

19) नावेली - आवेर्तान फुर्तादो (काँग्रेस), वालंका आलेमाव (तृणमूल)

20) नुवे - आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस), अरविंद डिकॉस्ता (रिव्होल्युशनरी गोवन्स)

21) पणजी - आतानासियो (बाबूश) मोन्सेरात (भाजप), उत्पल पर्रीकर (अपक्ष)

22) पेडणे - प्रवीण आर्लेकर (भाजप), राजन कोरगावकर (मगो)

23) फोंडा - केतन भाटीकर (मगो), राजेश वेरेकर (काँग्रेस)

24) पर्ये - दिव्या राणे (भाजप), विश्वजीत कृ. राणे (आप)

25) पर्वरी - रोहन खंवटे (भाजप), संदीप वझरकर (तृणमूल)

26) प्रियोळ - पांडुरंग (दीपक) ढवळीकर (मगो), गोविंद गावडे (भाजप)

27) केपे - एल्टन डिकॉस्ता (काँग्रेस), चंद्रकांत (बाबू) कवळेकर (भाजप)

28) साळगाव - केदार नाईक (काँग्रेस), जयेश साळगावकर (भाजप)

29) सांगे - सुभाष फळदेसाई (भाजप), सावित्री कवळेकर (अपक्ष)

30) साखळी - डॉ. प्रमोद सावंत (भाजप), धर्मेश सगलानी (काँग्रेस)

31) सावर्डे - गणेश गावकर (भाजप), दीपक प्रभू पाऊसकर (अपक्ष)

32) शिवोली - दिलायला लोबो (काँग्रेस), दयानंद मांद्रेकर (भाजप)

33) शिरोडा - सुभाष शिरोडकर (भाजप), महादेव नाईक (आप)

34) सांत आंद्रे - वीरेश बोरकर (रिव्होल्युशनरी गोवन्स), फ्रान्सिस सिल्वेरा (भाजप)

35) सांताक्रूझ - रुडॉल्फ फर्नांडिस (काँग्रेस), अंतोनियो फर्नांडिस (भाजप)

36) ताळगाव - जेनिफर मोन्सेरात (भाजप), टोनी रॉड्रिग्स (काँग्रेस)

37) थिवी - नीळकंठ हळर्णकर (भाजप), कविता कांदोळकर (तृणमूल)

38) वाळपई - विश्वजीत राणे (भाजप), तुकाराम परब (रिव्होल्युशनरी गोवन्स)

39) वास्को - कृष्णा (दाजी) साळकर (भाजप), कार्लुस आल्मेदा (काँग्रेस)

40) वेळ्ळी - क्रूझ सिल्वा (आप), सावियो डिसिल्वा (काँग्रेस)