मुंबई: जान बची तो लाखों पाए ही म्हण तर खूप प्रसिद्ध आहे. मृत्यूला हुल देऊन जर कोणी परतला तर त्याचा आनंद आणि रुबाब काही औरच असतो. असाच रुबाब या बकऱ्यांचाही आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी न दिल्यानं या बकऱ्यांचा जीव वाचला. ईदच्या दिवशी बकऱ्या विकल्या न गेल्यानं त्या खूप खूश झाल्या आहेत. त्यांना जीवदान मिळाल्यानं बकऱ्यांनी आनंद साजरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 सेकंदाचा हा व्हिडीओ खूपच सुंदर आहे. बकरी ईदच्या दिवशी जीव वाचलेल्या बकऱ्यांनी नाचून बागडत आपला आनंद साजरा केला आहे. मृत्यूच्या तावडीतून वाचलेल्या या बकऱ्यांनी देवाचं खूप आभार मानले असतील. रुपिन शर्मा यांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओतील बकऱ्यांच्या आनंदाला साजेसं संगीत या व्हिडीओमध्ये बॅगराऊंडला आहे. 



आतापर्यंत 1 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी जान बची तो लाखों पाए अशी कमेंट केली आहे. ह्या व्हिडीओमध्ये बकऱ्यांचा कळप दिसत आहे. एका व्यक्तीच्या मागे हा पूर्ण बकऱ्यांचा कपळ जात आहे. आनंदात नाचत नाचत या बकऱ्या चालल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


रुपिन शर्मा यांनी जब बक्र-ईद में हलाली से बकरा बच जाए...असं कॅप्शन देऊन सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठल्या भागातला आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.