बकरीनं मंदिरात गुडघे टेकून घेतला आशीर्वाद, Video Social मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असेल का? असा प्रश्न देखील पडतो. पण व्हिडीओ खरा असल्याचं कळताच आश्चर्य वाटतं.
Trending Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडीओ पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असेल का? असा प्रश्न देखील पडतो. पण व्हिडीओ खरा असल्याचं कळताच आश्चर्य वाटतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील असल्याचं बोललं जात आहे. एका मंदिरात बकरीनं गुडघ्यावर टेकून दर्शन घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ डेव्हिड जॉनससन नावाच्या युजर्सनं ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये मिस्टर जॉनसन यांनी लिहिलं आहे की, 'कानपूर जिल्ह्यातील बाबा आनंदेश्वर मंदिरात एका श्रद्धाळूने ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.'
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की मंदिराच्या गाभाऱ्यात भक्त दोन्ही हात जोडून उभे आहेत. काही जणं मंदिरात डोकं टेकवून आशीर्वाद घेताना दिसत आहे. तर एक बकरी पुढच्या पायाचे गुडघे टेकवून आशीर्वाद घेत असल्याचं दिसत आहे. ट
डेव्हिड जॉन्सनने पुढे लिहिले की, 'गभाऱ्याच्या बाहेर भक्तांसोबत शिवलिंगासमोर नतमस्तक झालेला बकरा चर्चेचा विषय राहिला.' एका दिवसात या व्हिडीओला शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. बाबा आनंदेश्वर मंदिर शिवाची पूजा केली जाते. गंगा नदीच्या काठी एक प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.