नवी दिल्ली: गोध्रा हत्याकांडप्रकरणी एसआयटी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पाच आरोपींपैकी दोन आरोपींना दोषी ठरवले. तर इतर तिघांची सुटका करण्यात आली. 


आरोपी इमरान भटकू आणि फारुख भाना या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २०१५-१६ मध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी सहा जणांना गोध्रा हत्याकांड प्रकरणी अटक केली होती. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप होता. २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते.