नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव कमी झाला आहे. शुक्रवारी 170 रुपयांनी सोनं कमी झालं आहे. सोन्याचा भाव 31,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की, रुपया डॉलरच्या तुलनेत आणखी खालच्या स्तरावर पोहोचल्यानंतर पुन्हा काही प्रमाणात रुपया मजबूत झाल्याने सोन्याचे भाव कमी झाले. गुरुवारी रुपया 69.10 प्रति डॉलर वरुन 68.79 प्रति डॉलर झाला.


40,600 वर पोहोचली चांदी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापारी आणि नाणे विक्रेत्यांकडून चांदीची मागणी कमी झाल्याने चांदी 200 रुपयांनी कमी झाली असून 40 हजार 600 रुपये प्रति किलो झाली आहे. व्यापाऱ्य़ांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांमध्ये पिवळ्या धातूची मागणी कमी होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉकमध्ये गुरुवारी सोनं 0.29 टक्क्यांनी कमी होत 1,248 डॉलर प्रति औंस झालं. चांदी 0.22 टक्क्य़ांनी कमी होत 15.98 डॉलर प्रति औंस झालं.


दिल्लीमध्ये सोनं 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धतेचं अनुक्रमे 170-170 रुपयांनी कमी झालं. सोन्याचा भाव अनुक्रमे 31,480 रुपये आणि 31,330 रुपये झाला.