मुंबई : कोरोना व्हॅक्सीन (Corona Vaccine) बाबत सकारात्मक बातम्या समोर येत असताना सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. वैश्विक बाजारात मंगळवारी सोने-चांदीच्या दरात वायदा आणि हाजिर या दोन्हीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. 


भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मंगळवारी ७० रुपयांची घसरण पाहायला मिळाली. आता १० ग्रॅम सोन्याचा दर ५०७६० रुपये आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत घसरण 


आंतरराष्ट्रीय स्तरावर मंगळवारी दुपारी सोन्याचा दर ०.१% कमी होऊन १८८८६.८३ डॉलरवर आला. तर अमेरिकेत सोन्याच्या दरात ०.१% घसरण झाली असून सोन्याचा दर १८८५.४० डॉलरचा भाव आला आहे. 


विजयादशमी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव कमी झाले. मात्र लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात ४०० रूपयांनी वाढ होवून ५१ हजार ५०० रूपये प्रती तोळा तर चांदीच्या भावात देखील १ हजार रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचे भाव ६४ हजार ५०० रूपयांवर पोहोचले आहेत. 


सध्या सर्वत्र दिवाळी आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न साराईची धामधूम पाहायला मिळत आहे. पुढचे काही दिवस सोने-चांदीची खरेदी कायम राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र लग्नसराईच्या काळात म्हणजेच  डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सोन्या दरात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.