दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात घट
सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, धनत्रयोदशीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात घट झाली आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ३० रुपयांनी घट झाली आहे. तर चांदी सुद्धा १०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनं ३० रुपयांनी स्वस्त झाल्याने प्रति १० ग्रॅम ३०,८०० रुपयांवर दर पोहोचला आहे. तर, चांदीमध्ये १०० रुपयांनी घट होत ४१,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
सध्याच्या स्तरावर ज्वेलर्स आणि इतर विक्रेता दागिन्यांच्या व्यवहारासाठी समोर येत नाहीयेत आणि त्यामुळे घट झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, परदेशात सोन्याच्या दरात होणाऱ्या घटला काही प्रमाणात ब्रेक लावला आहे.
राष्ट्रीय स्तरावर ९९.९ टक्के तसेच ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात ३०-३० रुपयांनी घट झाली आहे. ९९.९ टक्के शुद्धता असलेलं सोनं ३०,८०० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं ३०.६५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. कालच सोन्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली होती.
त्यामुळे तुम्ही जर सोनं-चांदी खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही या काळात सोनं-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा नक्की विचार करु शकता. कारण, येत्या काळात सोनं-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.