रक्षाबंधनाच्या आधी सोनं महाग की स्वस्त? वाचा आजचे दर
Gold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेऊया
Gold Price Today In Marathi: रक्षाबंधन या सणासाठी अवघा एक दिवस उरला आहे. त्यापूर्वीच आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सराफा बाजारात सोनं 400 रुपयांनी घसरले होते. तर चांदीला 800 रुपयांनी झळाळी आली होती. सोन्याचा दर 72750 रुपये प्रतितोळा तर, चांदीचा 84,000 रुपये प्रतिकिलोग्रॅम वर स्थिरावला होता. मागील आठवड्यात सराफा बाजारात सोनं 72450 रुपये आणि चांदी 82,500 रुपयांच्या स्तरवर स्थिरावली होती. मागील आठवड्यात सोनं जवळपास 300 रुपयांनी महागले होते तर चांदी 1500 रुपयांनी महाग झाली होती.
MCXवर सोनं-चांदी या आठवड्यात 2713 रुपयांची उसळी
MCX वर सोनं या आठवड्यात 71395 रुपये प्रतितोळा आहे. मागील आठवड्यात सोनं 69895 रुपये प्रतितोळावर स्थिरावले होते. या आठवड्यात सोन्याचे दर 1500 रुपयांनी महागले होते. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास MCXवर चांदी 83259 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली होती. तर, या आठवड्यात चांदी 2713 रुपयांवर स्थिरावली आहे.
IBJA अर्थात इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेटची किंमत 7060 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा भाव 6891 रुपये प्रति ग्रॅम, 20 कॅरेटचा भाव 6284 रुपये, 18 कॅरेटचा भाव 5719 रुपये आणि 14 कॅरेटचा भाव 4554 रुपये प्रति ग्रॅम होता. यामध्ये 3% GST आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाही. 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 81510 रुपये प्रति किलो होता.
आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस $2508 वर बंद झाला. चांदीची किंमत 29 डॉलर प्रति औंस आहे. शुक्रवारी, स्पॉट गोल्डमध्ये $ 50 ची वाढ नोंदवली गेली. कॉमेक्स सोन्याबद्दल बोलायचे तर ते $2546 प्रति औंस होते आणि कॉमेक्सवर चांदीची किंमत $29 प्रति औंस होती.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 65, 660 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 71, 630 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 53, 730 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6, 566 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 163 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 373 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 52, 528 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 57, 304 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 42, 984 रुपये