नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करायला हवी की नको असा मोठा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात 16 रूपयांची घट झाली त्यामुळे सोन्याचे भाव ४९ हजार ४८४ रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र चांदीच्या दराने २०५ रूपयांचा उच्चांक गाठला आहे. म्हणून चांदीचे भाव वाढून 67 हजार 673 रूपयांवर पोहोचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या व्यापारी सत्रामध्ये सोन्याचे भाव ४९ हजार ५०० रुपये ऐवढे होते. तर ग्राहकांना प्रति किलोसाठी ६७ हजार ४६८ रूपये मोजावे लागत होते. दरम्यान दिवाळीनंतर सोन्याच्या दरांत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 


goodreturns हिंदी वेबसाइट दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सराफा बाजारात आज दहा ग्रॅम सोन्याचे दर ४९ हजार ९४० रूपये आहे. कोलकातामध्ये १० ग्रॅम सोन्यासाठी ५२ हजार १६० रूपये मोजावे लागत आहेत. हैदराबादमध्ये ५० हजार ९६० रूपये, पुण्यात ४९ हजार ९४० रूपये, अहमदाबादमध्ये ५१ हजार  ४३० रूपये तर जयपूर आणि लखनऊमध्ये ५३ हजार ३१० रूपये मोजावे लागत आहेत. 


मुंबई, कोलकाता, बंगळुरूमध्ये चांदीचे भाव ६८ हजार ४०० रूपये प्रती किलो आहेत. हैरदाबादमध्ये चांदीचे दर ७२ हजार २०० रूपयांवर पोहोचले आहेत. पुण्यात चांदीचे दर ६८ हजार ४०० रूपये तर जयपूर आणि लखनऊमध्ये चांदी खरेदी करण्यासाठी ६८ हजार ४०० रूपये मोजावे लागत आहेत.