Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुच्या दरात तेजी आली होती. त्याचाच परिणाम मंगळवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर होताना दिसत आहे. त्यामुळं आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारीदेखील सोनं वधारलं होतं. त्यानंतर आजही सोन्याचे दर चढेच आहेत. तर, चांदीच्या दरातही 107 रुपयांची तेजी आली असून चांदी 95,304 प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCX वर सोनं पुन्हा 78 हजारांच्या वर पोहोचलं आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 78,600 रुपयांवर पोहोचलं आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर पुन्हा वधारल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं जवळपास $ 40च्या आसपास होते. सेंट्रल बँकेकडून पुन्हा एकदा सोन्याची खरेदी वाढली आहे. 6 महिन्यानंतर चीनच्या सेंट्रल बँकेने सोनं खरेदी केले होते. 


ऑक्टोबरमध्ये सेंट्रल बँकने 60 टन सोनं खरेदी केलं होतं. दर या वर्षातील सर्वात जास्त खरेदी ऑक्टोबरमध्ये झाली होती. ऑक्टोबरमध्ये भारताने 27 टन सोनं खरेदी केलं होतं. त्यामुळं रुपया घसरला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया रेकॉर्डच्या तुलनेत घसरला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकने 0.25 टक्के दर घट होऊ शकते, अशी शक्यता आहे. 


आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 750 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 72,050 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 610 रुपयांची वाढ झाली असून 58,950 रुपयांवर स्थिरावलं आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72, 050 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  78, 600 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 950 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,205 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,860 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 895 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,640 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62, 880 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,160 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-72, 050 रुपये
24 कॅरेट-78, 600 रुपये
18 कॅरेट- 58, 950 रुपये