Gold Price : वटपौर्णिमेला नवऱ्याकडे मागा सोन्याचा धागा, सोनं झालं स्वस्त
सोन्याच्या दरात मोठी घसरण... सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी
मुंबई : Gold Price Today : सराफा बाजारात गुरूवारी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट गोल्ड सोन्याच्या दकात 154 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 47060 रुपये सोन्याच्या दराची नोंद झाली आहे. तर चांदी 125 रुपयांनी चांदीचा दर घसरला असून आता 67866 रुपये प्रति किलो झालं आहे.
इंडियन बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, 24 जून 2921 रोजी देशातील सराफा बाजारात सोने चांदीचे दर खालील प्रमाणे आहेत. सोन्याचा 24 कॅरेटचा दर 47060 तर 23 कॅरेट सोन्याचा दर हा 46872 इतका आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 141 रुपयांनी घसरण झाली असून 43107 एवढा दर आहे. 18 कॅरेटच्या सोन्याचा दर 35295 रुपये झाला आहे. चांदीचा दर 67866 रुपये किलो आहे.
IBJA द्वारे जाहिर करण्यात आलेले दर देशभरात सर्वसाधारपणे सारखेच असतात. महत्वाचं म्हणजे या दरात जीएसटी नाही. गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 1600 रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी सोन्याचा दर 0.40 टक्क्यांनी वाढला होता. मात्र, चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तर मंगळवारीही मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर (Gold rates) साधारण 100 रुपयांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी वाढला. तर चांदीच्या दरातही 0.12 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.
देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.