नवी दिल्ली : स्थानिक बाजारपेठेतील मागणीत घट झाल्यामुळे सोने स्वस्त झाले आहे. शनिवारी दिल्लीतील सराफा बाजाराची किंमत ५० रुपयांनी कमी होऊन ३०,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. दरम्यान, चांदीच्या दरात २०० रुपयांनी घसरून ४०,५०० रुपये प्रतिकिलो राहिला. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांच्यामते, सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने स्थानिक ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट होत आहे. याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. तथापि, जगभरातील शेअर बाजारांत झालेली घट यामुळे सोन्यातील गुंतवणुक वाढली आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव ०.५० टक्क्यांनी वाढून १,२९७.१० डॉलर प्रति अंशावर बंद झाला.


सोन्याचे भाव


राष्ट्रीय राजधानीत ९९.९ टक्के आणि ९९.५टक्के शुद्धता प्रत्येकी ५० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे ३०,८०० रुपये आणि ३०,६५०  रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. शुक्रवारी सोन्याचा भाव ३५० रुपयांनी वाढला होता. आठ ग्रॅम गिन्नीची किंमत २४,७०० रुपयांवर कायम राहिली आहे.


चांदीचे नवे दर


सोन्याप्रमाणे चांदीचा भाव २०० रुपयांनी घसरून ४०,५०० रुपये किलो झाला. साप्ताहिक आधारावर डिलीव्हरीची किंमत २०५ रुपयांनी घसरून प्रति किलो ३,९७,३२५ इतकी झाली आहे.