Gold Price Today: आज दिवाळीचा पहिला दिवस. भारतात मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. या दिवसांत सोन्याची खरेदी करणे शुभ मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. उद्या धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. धनत्रयोदशीच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाली आहे. जाणून घेऊया काय आहेत आजचे सोन्याचे दर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज सोनं 490 रुपयांनी कमी झालं आहे. त्यामुळं आज 24 कॅरेटच्या दरात 79,800 रुपयांवर पोहोचले आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसु फुललं आहे. त्यामुळं उद्या सोन्याच्या खरेदीत आणखी वाढ होऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. 


आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रुपयांची घट झाली असून सोनं 79,980 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट होऊन 73,150 वर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 370 रुपयांची घट होऊन 59,850 रुपयांवर पोहोचले आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  79,800 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,850 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,315 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 980 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 985 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,520 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63,840 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,880 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 72,950 रुपये
24 कॅरेट-  79,580 रुपये
18 कॅरेट- 59,690 रुपये