Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशीदेखील सोन्याचे दर वाढले होते. तर, आज बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दराने नवीन रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली होती. तर, आज वायदे बाजारात सोनं वधारलं आहे. तर, चांदीलादेखील झळाळी आली आहे. वायदे बाजारात सकाळी 10च्या सुमारास 710 रुपयांनी वधारलं आहे. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांची मागणी वाढली आहे. मात्र, यंदाच्या धनत्रयोदशीला नागरिकांनी सोनं खरेदी करण्याऐवजी चांदीला प्राधान्य दिलं आहे. सोनं खरेदीऐवजी चांदीचे शिक्के खरेदी करण्यावर भर जास्त होता. काल चांदीला अधिक मागणी होती. मात्र आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची वाढ झाली आहे. आज प्रतितोळा सोनं 81,160 रुपयांवर पोहोचलं आहे. 


22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 74,400 रुपयांवर पोहोचलं आहे.18 कॅरेट सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं आज सोन्याच्या दरात 60,870 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे पडसाद सोन्याच्या दरांवर पडले आहेत. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  74,400 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  81,160 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  60,870 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,440 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8, 116 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 087 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   59,520 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,928रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,696 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 74,400 रुपये
24 कॅरेट- 81,160 रुपये
18 कॅरेट- 60,870 रुपये