Gold Price Today In Marathi: सोनं-चांदीच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात निच्चांकी घसरण झाली होती. मात्र, आठवड्याअखेर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज सोन्यानं 70 हजारांचा आकडा गाठला आहे. 24 कॅरेट सोनं 220 रुपयांनी महागले आहे. त्यामुळं शनिवारी 70,310 रुपये इतका आजचा सोन्याचा भाव आहे. 22 कॅरेट सोनं 200 रुपयांनी वाढलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 64, 450 रुपये इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्टेंबर महिन्यात फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करु शकते. तर, दुसरीकडे ईरान-इस्त्राइलमध्ये सुरू असलेल्या सततच्या संघर्षामुळं राजकारणातही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या दोन्ही परिस्थितीमुळं सोन्याची मागणी वाढू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सोनं हजार रुपयांनी वाढले होते. तर, आजही 200 रुपयांनी वाढले आहे. स्थानिक ज्वेलर्सकडून होत असलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  64, 450 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  70, 310 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  52, 730 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 445 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,031 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,273 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64, 450 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   56, 248 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    42, 184 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 64, 450 रुपये
24 कॅरेट- 70, 310 रुपये
18 कॅरेट- 52, 730 रुपये