नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या मागणीत झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरातील चढ-उतार यामुळे सोन्याच्या किंमत घसरण झाली आहे.


सोन्याच्या दरात घसरण


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ८५ रुपयांनी घट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,३६५ रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीच्या दरातही घसरण


सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना आता चांदीच्या दरातही घट झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात २१० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,६४० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


...म्हणून सोनं-चांदीच्या किंमतीत झाली घट


व्यापाऱ्यांच्या मते, स्थानिक बाजारात ज्वेलर्सकडून होणाऱ्या सोन्याच्या मागणीत घट झाली. तसेच डॉलरची किंमत सलग कमी होत असल्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.


राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात ८५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३०,३६५ रुपये आणि ३०,२१५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.