नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याची मागणीमध्ये घट झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर धांतुंच्या किमतीत सुरु असलेला चढ-उतारामुळे सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घट झाली तर चांदीच्या दरातही १२५ रुपयांनी घट झाली आहे.


सोन्याच्या मागणीत घट


ज्वेलर्सकडून होत असलेल्या कमी मागणीमुळे सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर ३०,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.


चांदीचा दरही झाला कमी


सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात १२५ रुपयांनी घट झाल्याने ३९,२०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.


देशाची राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे हा दर क्रमश: ३०,२५० रुपये आणि ३०,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली होती.