नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


सोन्याच्या दरात घसरण


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.


पाहा किती आहे प्रति तोळा दर


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमचा दर ३१,७०० रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीची चमकही फिकी 


चांदीच्या दरातही ५३५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे  चांदी ३९,४४० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.


...म्हणून स्वस्त झालं सोनं


ट्रेडर्सच्या मते, डॉलर मजबूत स्थितीत पोहोचल्यामुळे आणि त्यासोबतच स्थानिक बाजारात मागणी घटल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. वैश्विक पातळीवर सिंगापूरमध्ये सोने ०.६२ टक्क्यांनी कमी होत १,३३७.७० डॉलर प्रति औंस झाली आहे. तर, चांदीही १.०५ टक्क्यांनी घटल्याने १६.४७ डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.