नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याची मागणीमध्ये घट झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


सोन्याच्या दरात घसरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.


सोन्याचा दर 


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ३०५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३२,००० रुपयांवरुन ३१,९६५ रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीच्या दरातही घट


सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ३७० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४०,८३० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.