Gold Price at All Time High:  सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं वधारल्याने ग्राहक चिंतेत पडले होते. पण आज मात्र मौल्यवान धातुने ग्राहकांना थोडा दिलासा दिला आहे. आज सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. येत्या काही दिवसांतच नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी ही चांगली संधी ठरू शकते. तर, चांदीच्या दरात 400 रुपयांची वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 160 रुपयांनी घसरले आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 150 रुपयांनी घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. इस्राइल-लेबनान यांच्यातील संघर्षामुळं जागतिक बाजारात कच्च्या तेलासोबतच सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूच्या किंमती वधारल्या आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 77,240 वर स्थिरावला असून 22 कॅरेट सोन्याचा दर 70,800 रुपयांव स्थिरावला आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,240 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,930 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,080 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 724 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 793 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,640 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61, 792 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46, 344 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 70,800 रुपये
24 कॅरेट- 77,240 रुपये
18 कॅरेट- 57,930 रुपये