Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.
Today Gold Silver Price: तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही. मात्र आज (16 नोव्हेंबर) सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. (gold silver price update 16 November 2022)
नुकतंच दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. त्याआधी दसरा, नवरात्रौत्सव, गणेशोत्सव होता. या सणाच्या काळात सोन्याच्या विक्रीत वाढ नक्कीच झाली. पण ज्या आकड्यांची आशा होती त्या आकड्यांपर्यंत यश मिळू शकलं नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात तेजी घसरण दिसून येत आहे. आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,800 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,150 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 627 रुपये आहे.
24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई - 53,890 रुपये
दिल्ली - 52,300 रुपये
हैदराबाद - 52,150 रुपये
कोलकत्ता - 52,580 रुपये
लखनऊ - 52,300 रुपये
मुंबई - 52,150 रुपये
नागपूर - 52,180 रुपये
पुणे - 52,180 रुपये
तसेच सोन्याच्या (today gold silver price) किंमतीत घसरण होण्यामागचं मुख्य कारण हे महागाई आहे. विशेषत: ग्रामीण भागात सोन्याच्या मागणीत घट होऊ शकते. ग्रामीण भागातील अनेक नागरीक सणासुदीला दागिने खरेदी करतात. भारत हा सोन्याची सर्वाधिक खरेदी करण्यात जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. पण भारतात सध्या सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरु शकतात.
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हॉलमार्क (Hallmark)- सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.