Gold Rate Today : सोन्याचे दर `जैसे थे`, तर चांदी किचिंत महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या किंमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. सराफ बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदी महागली आहे. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..
Gold Silver Price on 27 March 2023: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे (Gold Rate) दर स्थिर आहेत तर चांदीत किचिंत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज, 27 मार्च 2023 ला भारतीय सराफ बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price ) कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आज सराफा बाजारात सोने आणि चांदी कालच्या (26 मार्च) दराने विकली जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा तुमचे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे लेटेस्ट दर...
सोन्याच्या दर जैसे थे...
जर आपण सोन्याच्या किमतीबद्दल बोललो तर bankbazaar.com नुसार आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच 22 कॅरेट सोने रविवारी (26 मार्च 2023) 55,780 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. ते आज त्याच किंमतीला विकले जाईल. पण जर आपण (24 के सोने) 24 कॅरेट सोन्याबद्दल बोललो तर जे सोने 58,570 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. ते आजही त्याच किमतीत विकले जाईल. म्हणजेच आज सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
वाचा: गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोलचे दर
चांदीचे दरही स्थिर
bankbazaar.com च्या मते, आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच काल रविवारी 76 हजार रुपये किलोने विकली जाणारी चांद आजही त्याच किमतीत विकले जाईल.
जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव कसे ठरतात
भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतो.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.
मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.