जीएसटी लागू होण्यापूर्वी सोनं खरेदीसाठी झुंबड
सोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडालीय.
मुंबई : सोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडालीय.
सोनं खरेदीवर तीन टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळं जीएसटीचा भार ग्राहकांवर पडणार आहे. आजवर ग्राहकांना केवळ एक टक्के जकात कर भरावा लागत होता. तर अबकारी कर आणि व्हॅट व्यापारी देत होते.
आता जीएसटी लागू झाल्यावर जकात, अबकारी करत आणि व्हॅट याचा भार ग्राहकांवरच पडणार असून त्यांना सोन्यावर तीन टक्के कर द्यावा लागणार आहे. दरम्यान, जीएसटी लागू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय.
परंतु, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टॅक्स स्ट्रक्चरमध्ये झालेल्या बदलांनंतर सोन्याच्या किंमती २८ हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. जीएसटीमुळे मार्केटमध्ये येत्या काही दिवसांत अनेक बदल होताना दिसून येतील... त्याचाच परिणाम म्हणून सोन्याच्या किंमती कोसळू शकतात.