मुंबई : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि यामुळे या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.


सोनं-चांदीच्या दरात घट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.



सोन्याच्या दरात घसरण


सोन्याच्या दरात २०० रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३१,३५० रुपयांवर पोहोचला आहे.



चांदीचा दर वधारला


सोन्याच्या किंमतीत घट झाली असातना चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ७५ रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा दर ३९,०५० रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.३० टक्क्यांनी घट होत १,३२२.२० डॉलर प्रति औंस झाला आहे. तर, चांदी ०.६४ टक्क्यांनी घट होत १६.२६ डॉलर प्रति औंस झाला आहे. 


राष्ट्रीय स्तरावर ९९.९ टक्के तसेच ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात २००-२०० रुपयांनी घट झाली आहे. ९९.९ टक्के शुद्धता असलेलं सोनं ३१,३५० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोनं ३०.६५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. कालच सोन्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली होती.