मुंबई : Gold, Silver rate today:  डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद आणि जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर दिसून आला. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये  (Delhi Bullion Market) 18 ऑगस्ट 2021 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत (Gold rate today) 152 रुपयांनी घसरून 46,328 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे चांदीच्या किमतीत (Silver rate today) घट झाली. सराफा बाजारात चांदीची किंमत 286 रुपयांनी घसरून 62,131 रुपये प्रति किलो झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने आणि चांदीच्या सध्याच्या किमतींमुळे (Gold, Silver spot rate) मागील ट्रेडिंग सत्रात उसळी दिसून आली होती. सोने प्रति दहा ग्रॅम 46,480 रुपयांच्या पातळीवर होते. त्याचवेळी, चांदीमध्ये 62,417 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेडिंग झाले.


सोने आणि चांदीमध्ये का झाली घसरण


एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सराफामध्ये संमिश्र कल दिसून आलाय. सोने किमतीत चढउतार दिसून आले. देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने 152 रुपयांनी 10 ग्रॅमने घसरले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी सांगतात की, अमेरिकेच्या मिश्रित बाजारामुळे सोने किमतींवर परिणाम झाला. सोने एका आठवड्याच्या उच्चांकावरून खाली आले. तथापि, कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्रकारांच्या धोक्यामुळे सुरक्षित आश्रय मागणी कायम आहे.


मजबूत रुपयामुळेही दबाव निर्माण झाला


डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोने किमतींवरही दबाव आला. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 6 पैशांनी मजबूत होऊन 74.29 वर आला. व्यवहार संपल्यावर रुपया डॉलरच्या तुलनेत 11 पैशांच्या वाढीसह 74.24 वर बंद झाला.


आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत


आंतरराष्ट्रीय बाजारात चढ -उतार दिसून आले होते. न्यूयॉर्कमध्ये सोने दरात वाढ झाली आहे. हा भाव 1,787 डॉलर प्रति औंसवर नोंदला गेला. तर चांदीचा भाव 23.74 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीचा संमिश्र परिणाम दिसून आला.


सोने वायद्याच्या किमती वाढल्या


बुलियन स्पॉट मार्केटच्या उलट वायदे बाजारात सोने किंमतीत वाढ दिसून आली. थेट मागणी वाढल्यामुळे ही वाढ झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स गोल्ड रेट) वर, ऑक्टोबर डिलिव्हरी फ्युचर्स किंमत 0.03 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 47,294 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवली गेली.