सिंगरोलीमध्ये मिळाली सोन्याची मोठी खाण
सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे.
सिंगरौली : सिंगरौलीमध्ये कोळशाच्या खाणीनंतर आता जमिनीखाली सोन्याचा खजाना मिळाला आहे. हा खजना सिंगरौली जिल्ह्यातील चकरिया गावात मिळाला आहे.
किती असेल सोनं?
इथे जवळपास ४ हेक्टरमध्ये दिड लाख टन सोनं असण्याची शक्यता आहे. सरकार आता इथे खोदकाम करण्याच्या तयारीत आहे. एप्रिल-मे महिन्यात लिलावाच्या माध्यमातून मायनिंग-लीज दिलं जाईल. सोनं मिळाल्याने मध्यप्रदेश आता छत्तीसगढ आणि राजस्थानच्या यादीत गणलं जाणार आहे. इथेही सोन्याच्या खाणी आहेत.
कुठे आहे खाणी?
२००२ पासून ८ जिल्ह्यांमध्ये सोन्याचा शोध सुरु होता. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोनं असण्याच्या शक्यतांवर अभ्यास करण्यात आला. काही ठिकाणांवर सर्व्हे बंद पडला. पण सिंगरौली आणि कटनीमधे सोन्याच्या खाणी असल्याचं स्पष्ट झालं.
कुठे किती मिळालं सोनं?
४ हेक्टर परिसरात दिड लाख टन सोनं असण्याची शक्यता आहे. सिंगरौलीमध्येच गुरहार डोंगरावर २१ वर्गमीटर, थापरामध्ये २४ वर्गमीटर, कर्माहीपुरी सिलीमध्ये ३२ वर्गमीटर आणि निबुआमध्ये २५ वर्गमीटर क्षेत्रात सोनं शोधलं जात आहे. पहिल्यांदाच इथे बहुमूल्य जिंकच्या खाणी मिळाल्या.