मुंबई : Gold Outlook News : सोने (Gold) किमतींबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत, पण क्वाड्रिगा इग्निओ फंड (Quadriga Igneo fund) हाताळणाऱ्या डिएगो पॅरिलाच्या भाकीताने खळबळ उडाली आहे. पुढील तीन ते पाच वर्षांत सोने 3,000-5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. (Gold News)


भारतात सोने एक लाख रुपयांच्या पुढे जाईल!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत बाजारात सोने भाव अजूनही सुस्तावलेला असला तरी येथेही तज्ज्ञांनी भाकित केले आहे की, यावर्षी सोने भाव 60,000 रुपयांच्या पुढे जाईल, एवढेच नव्हे तर दिवाळीपर्यंत सोने किंमत 52,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर भारताच्या संदर्भात डिएगो पॅरिलाची भविष्यवाणी अंमलात आणली गेली तर पुढील तीन वर्षांत भारतातील सोने किंमत 78,690 रुपयांवरून थेट 1,31,140 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल. गेल्या काही आठवड्यांपासून सोने रेट 47,000-48,000 रुपयांच्या दरम्यान फिरत आहे. यूएसबी ग्रुपच्या रणनीतिकारांचे म्हणणे आहे की या वर्षी सोने आणखी कमी होईल आणि ते 44,600 पर्यंत पोहोचू शकते. ही घट 2022 मध्येही कायम राहील.


मदत पॅकेजपेक्षा जास्त नुकसान


या अंदाजामागील फंड मॅनेजर दिएगोचा तर्क देखील ठोस आहे. ते म्हणतात की सोने दर नवीन उच्चांक गाठू शकतात. कारण गुंतवणूकदारांना अनेक देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या मदत पॅकेजमुळे मध्यवर्ती बँकांना येणाऱ्या अडचणींबद्दल फारशी माहिती नसते. हा तोच डिएगो आहे ज्याने 2016 च्या सुरुवातीला भाकीत केले होते की सोने पाच वर्षात नवीन उच्चांक गाठेल.


धोकादायक मालमत्तेचे फुगे तयार झालेत


जगभरातील कोरोना महामारीच्या दरम्यान सोने गेल्या वर्षी 2,075.47 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तथापि, काही काळासाठी ते सुमारे 1800 डॉलर प्रति औंस फिरत आहे. वाईट आर्थिक आणि वित्तीय धोरणांमुळे होणाऱ्या दीर्घकालीन नुकसानीबाबत फारशी जागरूकता नाही, असे ते म्हणाले. जाणूनबुजून व्याजदर कमी ठेवल्याने मालमत्तेचे फुगे तयार झाले आहेत. जे फुटले तर मोठे नुकसान होऊ शकते आणि मग मध्यवर्ती बँकांना अशा परिस्थितींना सामोरे जाणे आणि सामान्य स्थितीत येणे कठीण होऊ शकते.


मध्यवर्ती बँकांचे परिस्थितीवर नियंत्रण नाही !


फंड व्यवस्थापक डिएगो म्हणतात की, फेडरल रिझर्व्हने अमेरिकेत धोरण कडक करण्याचे संकेत दिल्यानंतर जून 2021 मध्ये सोने किमतीत घसरण नोंदवली गेली. डिएगोचा असा विश्वास आहे की, मध्यवर्ती बँकांवर परिस्थितीवर तितकेच नियंत्रण नाही. जसे लोक विचार करत आहेत. परिल्ला म्हणाली, "मी माझ्या मतावर ठाम आहे की पुढील 3 ते 5 वर्षात सोन्याची किंमत 5000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते."