मुंबई : सोन्याच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. त्यामुळे सोन्याकडे जे लोकं गुंतवणूक म्हणून पाहात आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. कारण तुम्ही सोन्यात गुंतवणूक करून किंवा दागदागिने खरेदी करून चांगला नफा कमवू शकता. आज रविवार असल्याने मल्टी कमोडिटी मार्केट (एमसीएक्स) बंद आहे. त्याचबरोबर, शेवटच्या व्यापाराच्या दिवशी सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 318 रुपयांनी घसरून सोन्याची किंमत 48 हजार 880 रुपयांवर बंद झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांदीबद्दल बोलायचे झाले तर, व्यापाराच्या शेवटच्या दिवशी जुलैमधील चांदीचा व्यापार 217 रुपयांच्या वाढीसह 72 हजार 328 रुपयांवर बंद झाला.


जागतिक बाजारातही घट


अमेरिकेतील सोन्याचा व्यापार 21.21 डॉलर घटून 1,876.87 डॉलरवर बंद झाला. त्याचबरोबर चांदीचा व्यापार 0.04 डॉलरने कमी होऊन 27.92 डॉलरवर बंद झाला आहे.


सोनं डिसेंबरमध्ये 53 हजार 500 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता


मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, बाजारातील लोकांचे म्हणणे आहे की, सोन्याचे दर कंसोलिडेशनमधून जात आहेत आणि पुढे ते प्रति 10 ग्रॅम 48 हजार 500 रुपयांपर्यंत प्रति 100 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. बुलियन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करावी कारण 2021 च्या डिसेंबर अखेर सोन्याचे दर 10 ग्रॅम 53 हजार 500 रुपयांपर्यंत होणार आहे.


आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता  म्हणतात की, "मध्यम आणि लॉग टर्म दृष्टीकोनातून पाहिले तर, सोन्यातली गुंतवणूक सकारात्मक आणि सेफ आहे. दिवाळीपर्यंत देशांतर्गत सोन्याच्या किंमती 53 हजार 500 रुपयांपर्यंत पोहचू शकतात. 15 जुलै 2021 नंतर सोन्याचा भाव वाढू शकतो, जो दिवाळीपासून या वर्षाच्या अखेरपर्यंत शिखरावर पोहचेल."