ग्राहकांना दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कोसळले, 10 ग्रॅमची किंमत वाचा
Gold and silver prices today on 14-05-2024: मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराईचे मुहूर्त असतात. अशावेळी दागिन्यांच्या खरेदीसाठी लगबग असते. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली आहे.
Gold and silver prices today on 14-05-2024: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मंगळवारी भारतीय वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोमवारी सोन्याचा दरात झालेल्या घसरण अद्यापही कायम आहे. भारतीय वायदे बाजारात (MCX)वर सोन्याच्या दरात 430 रुपयांची घट झाली आहे. आज मंगळवारी प्रति 10 ग्रॅमसाठी सोन्याचा दर 72,820 रुपये इतका आहे. मागील सत्रात सोन्याचा दर 73,250 वर बंद झाला होता. तर, आज चांदीच्या दरात 501 रुपयांनी वाढून एक किलोसाठी 85,387 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. तर, मागील सत्रात 84,886 रुपये इतका चांदीचा दर होता.
PPI म्हणजेच प्रोड्युसर प्राइस इंडेक्स आज अमेरिकेत जारी होणार आहे. याशिवाय किरकोळ महागाईचा आकडाही जाहीर होणार आहे. त्याआधीच सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. यूएस स्पॉट गोल्ड थेट 1 टक्क्यांनी घसरले होते आणि प्रति औंस $ 2,337 वर व्यापार करत होते. याआधी 22 एप्रिलनंतर सोन्याने उच्चांक गाठला होता. यूएस सोन्याच्या फ्युचर्समध्येही विक्री झाली आणि ते 1.3 टक्क्यांनी घसरून $2,343 वर आले आहेत.
गुडरिटर्ननुसार, आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,820 रुपये आहे. तर, सोमवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,250 इतकी होती. आज सोन्याच्या दरात तब्बल 430 रुपयांची घट झाली आहे. सोन्याच्या दरात होणारी चढ-उतार यावर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. सध्या देशभरात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घट यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे दर कसे असतील?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 66,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 72,820 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54,620 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 66,750 रुपये
24 कॅरेट- 72,820 रुपये
18 कॅरेट- 54,620 रुपये