निवडणुकीपूर्वी Gold दरात मोठी घसरण, घाई करा; ही संधी गमावू नका
Gold Price : सराफा बाजारात घसरण दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी सोने दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. Goldसह अनेक मौल्यवान धातूंचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याने मुंबईसह दिल्लीच्या सराफा बाजारातही गुरुवारी घसरण पाहायला मिळाली.
मुंबई : Gold Price : सराफा बाजारात घसरण दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी सोने दरात ही घसरण पाहायला मिळत आहे. Goldसह अनेक मौल्यवान धातूंचे आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याने मुंबईसह दिल्लीच्या सराफा बाजारातही गुरुवारी घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आणि तो 563 रुपयांनी घसरुन 48,215 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने घसरले
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,810 डॉलर प्रति औंस झाली. दुसरीकडे, चांदीचा भाव 23.10 डॉलर प्रति औंस राहिला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल म्हणाले की, यूएस एफओएमसीच्या निकालानंतर सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.
चांदी 63 हजारांच्या खाली
HDFC सिक्युरिटीजकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 48,778 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 1,186 रुपयांनी घसरुन 62,792 रुपये प्रतिकिलो झाला. यापूर्वीच्या व्यवहारात चांदीचा भाव 63,978 रुपये प्रति किलो होता.
विक्रमी पातळीवरुन अशी घसरण
गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरण होत आहे. गेल्या वर्षीच्या विक्रमी पातळीपेक्षा सध्या सोने 7500 रुपयांच्या खाली आहे. त्याचवेळी, चांदीचा विक्रमी दर 76,004 रुपयांपेक्षा कमी ते 13 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासायची?
- 24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले असते.
- 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले असते.
- 21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले असते.
- 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले असते.
- 14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले असते.
अशा प्रकारे जाणून घ्या सोने-चांदीची किंमत
तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा किंमत तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 8955664433 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.