Gold Price: नागरिकांनो! सोनं स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सोने 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61000 रुपये प्रति किलोच्या वर विकली जात आहे. तथापि, आजही सोने 4900 रुपयांनी आणि चांदी 18000 रुपयांनी स्वस्त होत आहे.
Today Gold Silver Rate : सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होते. सोन्याच्या दराने उसळी घेत 51 हजारांचा आकडा पार केला आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. कारण भारतात सोन्याचा (gold silver rate) पुरवठा करणाऱ्या बँकांनी शिपमेंटमध्ये कपात केली आहे. सोन्याचा पुरवठा करणार्या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांमध्ये त्यांची शिपमेंट वाढवली आहे. त्यांना तिथे चांगला प्रीमियम दिला जातो. सणासुदीनंतर भारतात लग्नसराई सुरू होते. या काळातही सोन्याचा खप जास्त असतो. (gold price hike in maharashtra on 6 october 2022)
सोन्याची आयात कमी झाली
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, तीन बँक अधिकारी आणि दोन व्हॉल्ट ऑपरेटर यांनी भारतात सोन्याच्या शिपमेंटमध्ये कपात केल्याचे सांगितले. भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची बाजारपेठ आहे. सोन्याच्या वहनात घट झाल्यामुळे भारतीय बाजारातील किंमती झपाट्याने वाढू शकतात. यामुळे खरेदीदारांना सोने खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागू शकते.
भारताला सोने पुरवठा करणाऱ्यांमध्ये ICBC स्टँडर्ड बँक, जेपी मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांचा समावेश आहे. हे तिघेही प्रामुख्याने सोनोचा पुरवठा भारतात करतात. साधारणपणे सणासुदीच्या सुरुवातीला जास्त सोने आयात केले जाते.
स्टॉक संपत आहे
रॉयटर्सने स्त्रोताच्या हवाल्याने म्हटले आहे की, आता स्टॉकमध्ये 10 टक्क्यांहून कमी सोने शिल्लक आहे. मुंबईतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, यावेळी अनेक टन सोन्याचा साठा असायला हवा होता. पण आपल्याकडे मोजकेच साठा उपलब्ध आहे.
तुर्की आणि चीन जास्त किंमत देत आहेत
भारतातील बेंचमार्क आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतीवर प्रीमियम फक्त एक ते दोन डॉलर आहे. तर गेल्या वर्षी या काळात चार डॉलर होते. दुसरीकडे, चीनमध्ये 20 ते 25 डॉलरपर्यंत प्रीमियम उपलब्ध आहे. त्याचदरम्यान तुर्कीमध्ये $80 पर्यंत प्रीमियम उपलब्ध आहे. कोरोना महामारीनंतर चीनमध्ये सोन्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे तुर्कस्तानमध्ये विक्रमी महागाईमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.
सराफा पुरवठा करणार्या आघाडीच्या बँकेच्या मुंबईतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बँका सोन्याची विक्री तेव्हाच करतील जेव्हा त्यांना जास्त किंमत मिळेल. चीन आणि तुर्कीमधील खरेदीदार सध्या खूप उच्च प्रीमियम भरत आहेत. त्यांच्या प्रीमियमची भारतीय बाजाराशी तुलना होऊ शकत नाही.
सप्टेंबर महिन्यात सोन्याची आयात कमी झाली
भारताची सोन्याची आयात सप्टेंबरमध्ये 30 टक्क्यांनी घसरून 68 टन झाली आहे. तर तुर्की सोन्याची आयात 543 टक्क्यांनी वाढली. ऑगस्टमध्ये, हाँगकाँगमधून चीनची निव्वळ सोने आयात चार वर्षांच्या उच्चांकावर जवळपास 40 टक्क्यांनी वाढली. दिवाळी आणि धनत्रयोदशीदरम्यान भारतीय बाजारपेठेत सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
सोन्याची आजची किंमत
सोने सध्या 4919 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
तर चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 18946 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79980 रुपये प्रति किलो आहे.
वाचा : Petrol Diesel चे दर वाढणार!; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजची किंमत
मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे (jewelry) किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.