सोन्याचे भाव वाढले, चांदीचे घसरले
लागोपाठ दोन दिवस सोन्याचे भाव पडले होते.
मुंबई : लागोपाठ दोन दिवस सोन्याचे भाव पडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये २५० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे भाव प्रतीतोळा ३०,५०० रुपये आहेत. सोनारांनी मोठ्या प्रमाणावर सोनं विकत घेतल्यामुळे हे भाव वाढले आहेत. लग्नाच्या मोसम असल्यामुळे सराफा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं आहे.
दिल्लीमध्ये ९९.९९ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३०,५०० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३०,३५० रुपये प्रति तोळा आहेत. मागच्या दोन दिवसांमध्ये सोन्याचे भाव २७० रुपयांनी पडले होते.
सोन्याच्या भावामध्ये वाढ झाली असली तरी चांदी ५० रुपये प्रती किलोनं कमी झाली आहे. चांदीचा आजचा भाव ३९,१५० रुपये प्रतीकिलो आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोनं ०.३९ टक्क्यांनी वाढून १२७९.६० डॉलर प्रति औन्स झाला आहे.