नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दिल्लीतील सरफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसलं. स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.


३० हजारी पार


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ३० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर ३०,४८० रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीच्या दरात घसरण


एकिकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. चांदीच्या दरात १२० रुपयांनी घट झाली त्यामुळे चांदीचा दर ३९,८८० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हालचाली आणि शिक्का निर्मात्यांकडून होणाऱ्या मागणीमुळे दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. 


आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.११ टक्क्यांची घट होत ते १,३१७ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीच्या दरात ०.३८ टक्क्यांनी घट होत १७.०९ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.


राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा दर क्रमश: ३०,४८० रुपये आणि ३०,४८० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.