Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांच्या आधीच सोनं-चांदीच्या दरांनी उसळी घेतली आहे. सराफा बाजारापासून ते वायदे बाजार दोन्हींकडे मौल्यवान धातुच्या दरात वाढ झाली आहे. आतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव मागील आठवड्यात 2640 डॉलरवर पोहोचले आहे. त्याचा परिणाम देशांतर्हंत बाजारपेठेवरही होताना दिसतोय. सोनं आज MCXवर 74,300 वर पोहोचले आहे तर चांदीचे दर 90,100च्या वर पोहोचले आहेत. तर, सराफा बाजारात तुम्ही आज सोनं खरेदी करण्यासाठी जाल तर 10 ग्रॅम सोन्याचे दर 76, 150 रुपयांवर पोहोचले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सोमवारी 23 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरांबाबत बोलायचे झाल्यास MCXवर सोनं आज 260 रुपयांच्या तेजीने 74,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. शुक्रवारी 74,040 रुपयांवर स्थिरावले होते. चांदीच्या दरात थोडी सुस्ती आली आहे. आज चांदी 90,150 रुपयांवर स्थिरावले होते. तर, सराफा बाजारात आज सोनं 220 रुपयांनी वधारले आहे. 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा दर आज 76,150 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट प्रतितोळा सोन्याच्या भावात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं आज 69,800 रुपयांवर स्थिरावले आहे. 


स्थानिक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचे दर वाढले आहेत कारण आता आगामी काळात सणांची रेलचेल असणार आहे. त्यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  69,800 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  76,150 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,110 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,960 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 593 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 695 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   55, 840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   60, 920 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    45, 688 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 69,800 रुपये
24 कॅरेट- 76,150 रुपये
18 कॅरेट- 57,110 रुपये