सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. याचाच परिणाम वायदे बाजारातही दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात मंगळवारी वायदे बाजारात वाढ झाली आहे. आत मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोनं 200 रुपयांनी वधारलं आहे तर चांदी 700 रुपयांनी वाढली आहे. सराफा बाजारातही सोनं-चांदी वधारलं आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोनं वधारल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे कारण हे दागिने विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांनी मागणी वाढवली आहे. अखिल भारतीय सराफा संघाच्यानुसार, औद्योगिक युनिट्स आणि नाणे निर्मात्यांच्या कमकुवत मागणीमुळे स्थानिक बाजारातील मागणी कमी झाली होती. त्यामुळं चांदी 1 हजार रुपयांनी घसरून 90,000 रुपये झाली आहे. गेल्या सत्रात चांदीचा व्यवहार 91,000 रुपये प्रति किलोवर स्थिरावली होती.
आज 24 कॅरेट सोन्याचे दर 200 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं प्रतितोळा सोन्याची किंमत 76,360 रुपयांवर स्थिरावली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,000 रुपये प्रतितोळा इतकी आहे. तर आज एक ग्रॅम सोनं खरेदी करायचं झाल्यास 7636 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 70,000 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 76,360 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,270 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,000 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 636 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 727 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56, 000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61, 088 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 45, 816 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 70,000 रुपये
24 कॅरेट- 76,360 रुपये
18 कॅरेट- 57,270 रुपये