Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price Today) दररोज चढऊतार पाहायला मिळतो. भोपाळमध्ये सोन्याच्या दरात किंचतशी घट झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये 200 रुपयांनी वाढ झाली आहे.  बँक बाजार डॉट कॉमनुसार,  शनिवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 47 हजार 540 रुपये इतकं आहे. तर इंदूरमध्येही याच दराने सोन्याच्या 10 ग्रॅमची विक्री होत आहे. (Gold Price Today 11 september 2021 know today gold silver price in mumbai and pune)   
 
भोपाळ सराफा बाजारात 10 सप्टेंबरला 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा  47 हजार 440 रुपये इतका होता. तर हाच 22 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 180 रुपये इतका होता. पण आज  24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 540 रुपये इतका आहे.  तर 22 कॅरेटचा दर हा 45 हजार 280 रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही 200 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचा प्रति 1 किलोचा भाव हा 10 सप्टेंबरला 68 हजार 300 रुपये इतका होता.  त्याच चांदीचा आज भाव हा 68 हजार 500 रुपये इतका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर


मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46 हजार 70 रुपये इतका असून 24 कॅरेटचा दर हा 47 हजार 70 रुपये इतका आहे. पुण्यात 22 कॅरेटचा भाव 45 हजार 180 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेटसाठी 48 हजार 630 रुपये मोजावे लागतील. 


अशी जाणून घ्या सोन्याची शुद्धता 


आयएसओद्वारे (Indian Standard Organization) सोन्याची शुद्धता जाणून घेता यावी, यासाठी हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेटपासून बनवण्यात आलेल्या अलंकारावर 999, 22 कॅरेटच्या दागिन्यावर 916,  21 कॅरेटवर 875 तर 18 कॅरेटपासून घडवण्यात आलेल्या अलंकारावर 750 हा आकडा लिहिलेला असतो. मोठ्या प्रमाणात 22 कॅरेट सोन्याची विक्री होती. तर काहींचा कळ हा 18 कॅरेट सोन्याकडे असतो.


22आणि 24कॅरेटमध्ये फरक काय? 


24 कॅरेट सोनं हे 99.9% शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं हे 91टक्के शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यांपासूनही अलंकार घडवले जातात. यामध्ये 9 टक्के तांबे, चांदी, झिंक आणि अन्य धातूंचा वापर केला जातो.  24कॅरेट सोन्यापासून अलंकार घडवता येत नाहीत. त्यामुळे बहुंताश अलंकार हे 22 कॅरेट सोन्यापासून बनवलेले असतात.