दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भाव
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या
Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं आणि चांदीत आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी घट झाली आहे. वायदे बाजारात आज सोनं-चांदी स्वस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं गेल्या 5 आठवड्याच्या उच्चांकी दरावरुन घसरण झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं $2700 रुपयांच्या जवळपास आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 1 टक्क्यांची घट झाली आहे. MCXवर सोनं 78,000 हजारांपर्यंत पोहोचले आहे तर चांदीदेखील 92,000 पर्यंत घसरली आहे. डॉलरच्या मजबुतीकरणामुळं सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम होताना दिसतोय.
आज 24 कॅरेट सोनं 600 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 78,870 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, चांदी 343 रुपयांनी घसरून 92,290 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने पुन्हा एकदा सोन्याच्या साठ्यात वाढ केल्याने पुन्हा एकदा मागणी वाढली असल्याचे बोललं जातंय. तसंच, भारतात आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळंदेखील सोन्याची मागणी वाढली आहे.
आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची घट झाली असून 72,300 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांनी स्वस्त झाल्याने 59,160 रुपयांवर पोहोचलं आहे.
24 कॅरेट सोनं 600 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 78,870 रुपयांवर पोहोचलं आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 72,300 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 78,870 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,160 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,230 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,887 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 916 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,840 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63, 096 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 47,328 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-72,300 रुपये
24 कॅरेट 78,870 रुपये
18 कॅरेट- 59,160 रुपये