Gold Price Today: गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात आपण सर्वांनीच लक्षणीय वाढ पाहिली परंतु एप्रिल महिन्यापासून (Gold price today) मात्र ही वाढ काही अंशी कमी झाल्याचेही पाहायला मिळाले होते. गुढीपाडव्याच्या पुर्वी आणि नंतर काही अंशी ही वाढ घसरत होती त्यामुळे सोन्याचे दरही घसरल्याचे पाहायला मिळाले होते. आता परत सोन्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे. सोन्याच्या दरात आजही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. अक्षयतृतीया जवळ येते आहे तेव्हा (Gold Buy today) तुम्हीही सोनं खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तेव्हा सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी आधी ही बातमी वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 24 कॅरेट सोन्याचे दर ही 61,830 रूपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 56,660 रूपये प्रति तोळा इतके आहेत. त्यामुळे (24K Gold Price Today) आता तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 


गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 10 एप्रिलनंतर सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. 11 एप्रिलला 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,700 रूपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 60,760 रूपये इतके होते. 12 एप्रिलला हे भाव थोडे अजून वाढलेले दिसले. या दिवशी सोन्याचे भाव हे 22 कॅरेट 56,200 रूपये प्रति तोळा होते तर 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 61,310 प्रति तोळा इतके होते. म्हणजेच एका दिवसात 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ही अनुक्रमे 500 रूपये प्रति तोळा आणि 550 रूपये प्रति तोळ्यानं वाढली. 


काय होते आत्तापर्यंतचे दर? 


गुडरिटर्न्सनुसार, या आधी 10 दिवस सोन्याचे दर हे प्रचंड वाढले होते. 24 कॅरेट सोनं हे 61,115 रूपये प्रति तोळा इतके होते. तर 22 कॅरेट सोनं हे 56,023 रूपये प्रति तोळा इतके होते. त्यातून गेल्या महिन्याभरातील हा दरही प्रचंड वाढला आहे. 24 कॅरेट सोनं हे 60,504 रूपये प्रति तोळा इतके होते तर 22 कॅरेट सोनं हे प्रति तोळा 55,462 रूपये इतके होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ही चढउतार दिसते आहे. 


तुमच्या शहरातील दर जाणून घ्या (प्रति ग्रॅम)


  • नागपूर - 5,595 रूपये प्रति ग्रॅम 

  • नाशिक - 5,598 रूपये प्रति ग्रॅम

  • पुणे - 5,595 रूपये प्रति ग्रॅम 

  • सोलापूर - 5,595 रूपये प्रति ग्रॅम 

  • कोल्हापूर - 5,595 रूपये प्रति ग्रॅम