Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सोमवारी सोनं किंचित स्वस्त झालं होतं. तर आजदेखील सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. वायदे बाजारात आज सोनं-चांदीचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. वायदे बाजारात आज सोनं-चांदीचे दरात घसरण होत आहे. दिवाळी अगदी 15 दिवसांवर आली असतानाच सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पितृपक्षात सोनं खरेदी महाग झाली होती. मात्र, नवरात्रीमध्ये पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरले आहेत. या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर, चांदीच्या दरात देखील घट झाल्याचे समोर आले आहे. आज चांदी 90,612 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर ट्रेड करत आहेत. काल चांदी 90,736 रुपयांवर स्थिरावली होती. आज 24 कॅरेट सोनं 220 रुपयांनी कमी झालं आहे. आज प्रतितोळा सोनं 77,400 रुपयांवर स्थिरावलं होतं. 


सोन्याच्या दरात घट होत असल्याचे पाहून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काहीच दिवसांत सोनं खरेदीची शक्यता वाढणार आहे. लग्नसराईसाठी ग्राहक दिवाळीचा मुहूर्तवर सोनं खरेदी करतात. त्यामुळं सोन्याची मागणीदेखील वाढणार आहे. आज 22 कॅरेट सोनं 200 रुपयांनी घसरलं असून प्रतितोळा 70,950 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोनं 170 रुपयांनी घसरून 58,050 रुपयांवर स्थिरावलं आहे.


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,950 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,400रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,050 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,095 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 740  रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 805 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,760 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,920 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,050 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 70,950 रुपये
24 कॅरेट- 77,400 रुपये
18 कॅरेट- 58,050 रुपये