Gold Price Today: सोन्याच्या दरात आज किंचितशी घट पाहायला (Gold Price Today) मिळते आहे परंतु अद्यापही 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 60 हजार पारचं आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी तितकासा मोठा दिलासा आहे अशातलाही भाग नाही. आजच्या सोन्याच्या दरात (24 Carat Gold Price) फारशी घटही नाही आणि फारशी वाढही नाही. त्यातून आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलाढाल झालेलीही पाहायला मिळते आहे. याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढण्याचीही शक्यता वर्तवली गेली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात थोडीफार घट होते आहे. त्यामुळे काहीप्रमाणात ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी दिलासाही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सोन्याच्या दरात किंचितशी घट झाली आहे. आज सोन्याचे दर हे कालच्यापेक्षा 10 रूपयांनीच घटले आहेत. गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा 61,030 रूपये प्रतितोळा इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 55,940 रूपये प्रति तोळा (Gold Price Hike) इतका आहे. (Gold price today 16 the april 2023 know the latest rates in your city)


दोन महिन्यात मोठी वाढ 


सोन्याचे दर हे गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून वाढू लागले आहेत. या दरांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यातून एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून सोन्याच्या (Gold Price Graph) दरात प्रचंड वाढ झाली आहे. येत्या काही काळात ही वाढ कायम राहण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 7 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोनं हे 60,870 रूपये प्रति तोळा होते तेच सोनं आज मोठ्या चढउतारानं 61,030 रूपये प्रति तोळा आहे. थोडक्यात, सोन्याच्या दरात अद्यापही घसरण नाही. 20 मार्च 2023 पासून पाहिले तर सोन्याचे दर हे 57 हजारांच्या आसपास होते. एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला 60 हजारांच्या पार गेले होते. 


सोन्याचे दर वाढण्याची शक्यता? 


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दरही वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये (Gold Price at International Market) सोनं हे वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याचे दर हे 2004.00 प्रति आऊन्स आहेत. त्यामुळे येत्या काळात सोन्याचे दर काय राहतील हेही पाहणे आवश्यक आहे. 


जाणून घ्या तुमच्या शहरातील दर


  • औरगाबाद - 5,595 रूपये प्रति ग्रॅम 

  • कोल्हापूर -  5,595 रूपये प्रति ग्रॅम 

  • नागपूर -  5,594 रूपये प्रति ग्रॅम 

  • नाशिक -  5,597 रूपये प्रति ग्रॅम 

  • पुणे - 5,594 रूपये प्रति ग्रॅम