मुंबई : Gold, Silver Rate Update, 18 August 2021: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत.   MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा एका रेंजमध्ये ट्रेडिंग करत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी सोन्याचा वायदा 47280 रुपयांवर बंद झाला. मंगळावरी सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. इंट्रा डेमध्ये सोने वायदा  47 हजार 549 रूपयांपर्यंत पोहोचला आहे. पण ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. आज सोन्याचा ऑक्टोबर वायदा थोड्या वाढीने उघडला आहे. सोन्याचा वायदा 47 हजार 300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या  आठवड्यातील सोन्याचे दर (16-20 ऑगस्ट)
दिवस                     सोने (MCX ऑक्टोबर वायदा)


सोमवार                    47 हजार 225/10 ग्रॅम


मंगळवार                47 हजार 280/10 ग्रॅम


बुधवार                    47 हजार 305/10 ग्रॅम(ट्रेडिंग सुरू)


 चांदीबद्दल सांगायचं झालं तर, चांदीच्या सप्टेंबर वायदामध्येही मंगळवारी शेवटच्या तासात मोठी घसरण दिसून आली. इंट्रा डेमध्ये चांदीचे दर 63 हजार 494 रूपये प्रती किलोवर ट्रेड करत आहे. पण चांदीच्या दरांमध्ये तेजी जास्त काळ टिकू शकली नाही. आज चांदीच्या दरात 200 रुपयांनी वाढ झाली असून चांदी 63 हजार 400 रुपयांच्या वर आहे.


दरम्यान,  2020 साली सोन्याच्या दराने तब्बल  56 हजार 2534 रूपयांचा आकडा गाठला. यंदाच्या वर्षी सोन्याच्या दरात जवळपास 8 हजार 530 रूपयांची  घट नोंदवण्यात आली आहे.