मुंबई : रुपयाच्या विनिमय दरातील सुधारणांमुळे अर्थिक राजधानी मुंबईत सराफा बाजारात मंगळवारी सोन्यात घसरण नोंदवली गेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईतील सोने-चांदीचा भाव


मुंबईतील सोन्याच्या किंमती काल 48410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. आज मुंबईतील सोन्याचा भाव 48410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर झाला. याउलट, चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढून 60,508 रुपये किलो झाला.


गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 61400 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.


एमसीक्सवर आजचे भाव


सोने 48029 प्रति तोळे


चांदी   61755 प्रति किलो


सोने विक्रमी किंमतीपेक्षा 8,000 रुपयांनी स्वस्त


गेल्या वर्षी सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला होता.


सध्या सोन्याचा भाव 47,246 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.


सोन्याच्या सध्याच्या किमतीची त्याच्या सर्वकालीन उच्च दराशी तुलना केल्यास, सोने त्याच्या विक्रमी किमतीपासून 8,000 रुपये प्रति दहा ग्रॅमने स्वस्त मिळत आहे.